Take a fresh look at your lifestyle.

‘मी’ ‘माझे’ ही भावना दुःखाची निर्मिती आहे !

'मी'ची जाणीव करून देणारा विज्ञानमय कोश आहे.

विज्ञानमय कोश हा चौथा कोश मनापेक्षाही सूक्ष्म आहे. हा कोश म्हणजे एक प्रकारची अंतर्ज्ञानी भावना होय. ती विचार किंवा कोणत्याही कारणाच्या पलीकडे असते. या कोशातून सृजनशीलता किंवा नवकल्पना उगम पावतात.
पाच ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांचा विज्ञानमय कोशात अंतर्भाव होतो. या कोशाचे वैशिष्ट्य असे की, हा ‘मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे’ इत्यादी प्रकारचा अभिमान-जाणीव बाळगतो.

या विज्ञानमय कोशाच्या ठिकाणी ज्ञान-शक्ती असते.स्वचिंतनाने विज्ञामय कोशात प्रवेश करता येतो. हा प्रवेश म्हणजे आनंदाच्या अवघं एक घर दुर असणं आहे. मी आणि माझं ही जाणीव या कोशात होत असते.मी अमुक आहे, मी असा आहे,मी म्हणजे असा वागणारा व्यक्ती वगैरे सर्व कल्पना कायम करुन जगण्याची पद्धत रूढ होते.
माझी मुलं,बायको,गाडी,संपत्ती अशा अनेक व्यक्ती आणि वस्तुंना माझं समजण्याचं ज्ञान या कोशात तयार होत असलं तरी हे ज्ञानच दुःखाचं कारण ठरते.
मागच्या तीन कोशांवर आपण चिंतन करुनच पुढचा विचार करत आहोत.कारण अन्न,प्राण,मन हे तीनही कोश शुद्ध झाल्याखेरीज विज्ञानमय कोशातील संकल्पना, रुढी बदलता येणार नाहीत.
एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी अज्ञान पहायला मिळते पण ज्ञानाची माहिती मिळाली की ती व्यक्ती ते अज्ञान त्यागते आणि ज्ञानाचा स्विकार करते.
पंचकोश ही आध्यात्मिक आणि योगशास्त्रीय संकल्पना तैत्तिरीयोपनिषदातील दुसर्‍या व तिसऱ्या अध्यायात वर्णिली गेली आहे. त्यामुळे या उपनिषदात या संकल्पनेचा उगम दिसून येतो.तैत्तिरीय ऋषींना आत्मचिंतनाने झालेली आत्मोन्नती करणारी जाणीव त्यांनी या ग्रंथात ग्रथित केली आहे.या कोशात बुद्धीचा समावेश असल्याने नवसंकल्पना,नवविचारांचं निर्माण इथं होणारच यात काही शंका नाही. जुने चुकीचे संस्कार खोडण्याची व्यवस्था येथे आहे.
रामकृष्णहरी