Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸8 मार्च 2022

▪️मेष : स्वकष्टावर अधिक भर द्याल. कामातील तांत्रिक गोष्टी जाणून घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल. उपासनेला बळ मिळेल.
▪️वृषभ : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही गोष्टी अचानक घडू शकतात. मनातील आकांक्षा पूर्ण कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे.
▪️मिथुन : कलेसाठी अधिक वेळ काढावा. भागीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. नवीन लोकांशी सबुरीने वागावे. कोणतीही गोष्ट फार ताणू नका.
▪️कर्क : जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. छुप्या शत्रूंचा त्रास कमी राहील. नातेवाईकांशी सबुरीने वागावे.
▪️सिंह : पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. शक्यतो पैजेत भाग घेऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
▪️कन्या : वैवाहिक सौख्यात भर पडेल. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन विषयक कामांना गती येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.
▪️तूळ : काहीसा सुस्तपणा जाणवेल. कामात अधिक ऊर्जा येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वबळावर कामे हाती घेता येतील.
▪️वृश्चिक : प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मित्र-परिवार जमवाल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल.
▪️धनू : कौटुंबिक प्रश्न आधी मार्गी लावावेत. आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. खर्चाकडे लक्ष ठेवावे.
▪️मकर : हस्तकलेला अधिक वेळ द्यावा. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात.
▪️कुंभ : मानसिक स्वास्थ्य जपावे. हजरजबाबीपणा दाखवाल. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
▪️मीन : सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रेमळपणे गोष्टी साध्य करता येतील. दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.