Take a fresh look at your lifestyle.

औषधांच्या गोळ्यांच्या पॅकेटवरील लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय असतो ?

'असे' आहे शास्त्रीय कारण !

गोळ्यांच्या स्ट्रीपवर मागच्या बाजूला इतर माहितीसोबतच एक लाल रंगाची रेष पहायला मिळते. मात्र तुम्ही कधी हा विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात..
आरोग्य मंत्रालयानुसार, गोळ्यांच्या ज्या पॅकेटवर लाल लाईन असते, ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नका. केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच दिली जाते जेव्हा या औषधांसाठी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी दिली असेल.
अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या दुरूपयोगावर लक्ष ठेवण्यासाठी पॅकेटवर लाल रेषा दिली जाते. लाल रेषा देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, लघवीसंबंधी संक्रमण आणि एचआयव्हीसहीत अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अ‍ॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे.
आरोग्य आणि परिवार मंत्रालयानुसार, अशाप्रकारची औषधं खासकरून अ‍ॅंटीबायोटिक्स ज्यांच्या पॅकेजिंगवर लाल रेषा असते. त्यांचा वापर एखाद्या योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही करू नका.
● Rx : याचा अर्थ असा होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
● NRx : याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे. हे केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.
● XRx : याचा अर्थ हे असं औषध आहे जे केवळ डॉक्टर विकू शकतात. त्यांच्याकडे यांचं लायसन्स असावं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध स्वतः मेडिकल स्टोरमधून खरेदी करू शकत नाही.