Take a fresh look at your lifestyle.

महिलांनो, स्वयंपाक करताना ‘या’ चुका टाळा…!

त्याबद्दल माहिती पाहूयात !

 

 

महिलांसाठी स्वयंपाक म्हणजे नित्याचीच बाब. मात्र स्वयंपाक करताना महिलांकडून काही चुका होत असतात. ज्या टाळणे गरजेचे आहे. त्याबद्दल माहिती पाहूयात…

● भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. कारण त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे पाणी फेकू नका. तुम्ही हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरा.

● भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नका. कारण यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावी. जर वेळेचा अभाव असेल तर फळे, भाज्या आधीच कापून ठेवाच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.

● कढईत एखादा पदार्थ बनवताना त्यावर नेहमी झाकण ठेवा. अशाने तो पदार्थ लवकर शिजतो आणि त्यातील पौष्टिक तत्त्वही नष्ट होत नाही.

 

● तळण झाल्यावर उरलेले तेल दुसर्‍या पदार्थासाठी वापरण्याची सवय सामान्य असली तरी चुकीची आहे. कारण अशा तेलाने चरबी वाढते आणि लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.

● फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जसे दूध, क्रीम, बटर, अंडी, उरलेले अन्न व इतर पदार्थांना काढल्यावर ताबडतोब गरम करू नका. ते पदार्थ वापरण्याआधी किमान अर्धा तास बाहेर काढून ठेवा.