Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात ‘ही’ पेय टाळा !

अन्यथा वजन वाढेल!

विशेषतः आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थांचे सेवन करतो. दरम्यानच्या काळात पेयांचा सेवन करू नका, याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती पेयं…
● उन्हाळ्यात वजन वाढवण्यासाठी कोल्ड्रिंक्स पूरक ठरतात. कारण त्यामध्ये जास्त कॅलरीज असतात, जे शरीरातील फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
● उन्हाळ्यात अनेकदा जेवणानंतर आईस्क्रीम आणि कस्टर्ड खाल्ले जाते. ज्यामध्ये कॅलरीज अधिक असतात. या उच्च-कॅलरी पदार्थ तुमचे वजन वाढवू शकतात.
● एका ग्लास शेकमध्ये 300 ते 500 कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन वेगाने वाढते.

● उन्हाळ्यात अतिरिक्त कॅलरीजचे सेवन वजन वाढवण्यास प्रभावी ठरते. त्यामुळे अशी पेय पिणे टाळाच.
● कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, लिंबू सरबत, आवळा सरबत, ताक यासारखी पेय अवश्य घेऊ शकता.