Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸6 मार्च 2022

▪️मेष : दिवस आळसात जाईल. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील.
▪️वृषभ : कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल.
▪️मिथुन : कामाची चोख पावती मिळेल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल.
▪️कर्क : नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल. वडीलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात.
▪️सिंह : विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.
▪️कन्या : तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. भागीदारीत चांगला लाभ होईल.
▪️तूळ : घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल.
▪️वृश्चिक : आप्तेष्टांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रीत करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा.
▪️धनू : क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल.
▪️मकर : जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कुटुंबात काही बदल घडून येतील.
▪️कुंभ : कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल. कामाचा ताण जाणवेल.
▪️मीन : कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. सर्वांशी गोडीने वागाल.