Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸5 मार्च 2022

0
▪️मेष : मनातील इच्छा पूर्ण होतील. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील.
▪️वृषभ : वाहनविषयक कामे पार पडतील.भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.
▪️मिथुन : कामातून आनंद शोधावा. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.
▪️कर्क : करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. नवीन विषयात रुची दाखवाल.
▪️सिंह : टापटिपीकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल. दिवसभर कामात गुंतून राहाल.
▪️कन्या : आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
▪️तूळ : चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते.
▪️वृश्चिक : चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. तुमचा मान वाढेल.
▪️धनू : कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल. घाईने कोणतेही काम करू नका.
▪️मकर : सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते.
▪️कुंभ : व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा. कामाचा ताण जाणवेल.
▪️मीन : मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील.
Leave A Reply

Your email address will not be published.