Take a fresh look at your lifestyle.

सुरेश धुरपते उतरणार ‘झेडपी’च्या मैदानात !

ढवळपूरी गटातून निवडणूक लढविणार.

पारनेर : उद्योजक तथा राष्ट्रवादीचे नेते सुरेश धुरपते मित्रपरिवार प्रणित जामगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत माता मळगंगा सहकार पॅनलचा पराभव झाला असला तरी श्री. धुरपते हे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले सुरेश धुरपते यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी जामगाव गावात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच उमेदवारांना मदत केली. यातूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीत सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीला साथ केल्यानंतर नंतरच्या बदलत्या काळातही त्यांनी राष्ट्रवादीलाच पण आमदार निलेश लंके यांना साथ दिली.
कोणतीही राजकीय सत्ता हातात नसताना देखील श्री.धुरपते यांनी आर्थिक पदरमोड करून गावच्या विकासासाठी तसेच गोरगरिबांना वैयक्तिक कारणासाठी मदत केली माता मळगंगा देवीच्या भव्य मंदिर व सहभाग मंडपासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. पंचायत समितीच्या गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनंदाताई यांना राष्ट्रवादीकडून पंचायत समितीची उमेदवारी मिळाली होती. या संधीचे सोने करीत त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या. सध्या त्या पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती आहेत.आमदार निलेश लंके यांच्याशी असणारे सख्य आणि पंचायत समितीच्या माध्यमातून श्री. धुरपते यांनी जामगाव गावाबरोबरच पंचायत समिती गणातही अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.
जामगावमध्ये बांगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे, फानदरा रस्ता मुरमीकरण, तागड मळा ,मेहेर वस्ती कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ९५ लाख, सोबले वस्ती पाझर तलाव दुरुस्ती ३४ लाख, मुस्लिम स्मशानभूमी २५ लाख,हायमॅक्स २. ५ लाख, जामगाव अंगणवाडी समोर पेव्हिंग ब्लॉक २ लाख, पानमळा, धुरपते वस्ती हायमॅक्सही ही विकासकामे मंजूर असून त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत तर येत्या दोन महिन्यात भांडगाव रोड पवार वस्ती दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,मारुती मंदिर सभा मंडप १५ लाख , मुंजाळ वस्ती यमाई मंदिर सभामंडप १० लाख, जामगाव ते पाडळी तर्फे कान्हुर डांबरीकरण ३० लाख, फानदरा रस्ता डांबरीकरण २५ लाख , सोबले मळा अंगणवाडी पेव्हिंग ब्लॉक ४ लाख, नाईक,मेहेर वस्ती भांडगाव रोड मुरमीकरण, शिंदे मळा (नवनाथ सोनबा शिंदे) हायमॅक्स जामगाव घाट ते सोबले मळा डांबरीकरण ही कामे होणार आहेत.
जामगावात केलेली विकास कामे, मतदारसंघाशी असलेला जनसंपर्क या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वतीने ढवळपूरी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ही चर्चा सर्वत्र आहे मात्र, गावात केलेल्या विकासकामांच्या जोरावर धुरपते यांनी सेवा संस्था निवडणुकीत पॅनल उभा केला होता.सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे आर्थिक हित साधून संस्थेला कार्यालयासाठी अद्यावत इमारत तयार करण्याची ग्वाहीही श्री. धुरपते यांनी दिली होती. मात्र, या पॅनेलचा पराभव झाल्याने श्री. धुरपते हे निवडणूक लढविणार कि नाही अशी सर्वत्र चर्चा सुरु झाली होती,गाव पातळीवरील ही निवडणूक हरली असली तरी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची गळ त्यांना कार्यकर्त्यांनी घातली आहे.त्यानुसार श्री. धुरपते यांनीही ढवळपुरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान जामगाव येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करूनही धुरपते यांच्या पॅनलला हार पत्करावी लागल्याने ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील मतदारवर्गही हळहळला आहे. जामगाव सेवा संस्थेच्या निवडणूकीतील पराभवाची भर जिल्हा परिषद निवडणूकीत काढण्याचा मनोदय कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
आमच्या गावचे सुपुत्र, उद्योजक सुरेशशेठ धुरपते यांनी केलेल्या विकासकामांमुळे जामगावचा चेहरा मोहरा बदलला आहे.विकासाच्या मुद्दावरच त्यांनी सेवा संस्थेची निवडणूक लढविली. मात्र काही मतदारांना विकासापेक्षा ‘पैसा’ महत्वाचा वाटल्याने पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव आमच्या जिव्हारी लागला असला तरी आगामी काळातही श्री. धुरपते हे राजकारणात सक्रिय राहणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केली.