Take a fresh look at your lifestyle.

ढवळपुरीच्या चिमुकल्या ‘श्री’ ने गाजविला यंदाचा गणेशोत्सव !

'एक तरी मोदक खा ना गणुल्याची धुम !'

पारनेर: पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील श्री जाधव या चार वर्षाच्या चिमुकल्याने यंदाचा गणेशोत्सव चांगलाच गाजविला. आपल्या बोबड्या आवाजात पण तितक्याच तालासुरात त्याने गायलेले ‘ एक तरी मोदक खा ना गणुल्या रे बाप्पा’ हे गाणे प्रत्येक मंडळात आणि घराघरात ऐकायला मिळत होते. 

सोशल मीडियावर हे गाणे तुफान व्हायरल झाले. अनेकांनी हे गाणे आपल्या स्टेट्सवर ठेवल्याचे पहायला मिळाले. नेटकऱ्यांनी या गाण्याला प्रचंड पसंती दिली. श्री हा ढवळपुरीचे गायक तान्हाजी जाधव यांचा मुलगा गेल्या वर्षी नाट्यगीत गायल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यावेळी खुद्द बिग बॉस अमिताभ बच्चन यांनी ही त्याचे कौतुक केले होते.

वृत्त वाहिन्यांनी ही त्याची दखल घेतली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रच त्याच्या प्रेमात पडला.

त्यानंतर वर्षेभर मेहनत घेऊन त्याच्या वडिल तान्हाजी जाधव यांनी ‘एक तरी मोदक खा ना गणुल्या रे बाप्पा’ हे गाणे व्हिडीओसह श्री वर चित्रीत केले अन् उभ्या महाराष्ट्रात ते व्हायरल झाले. सर्वांनीच बोबड्या श्री चे कौतुक केले. ऐन गणेशोत्सवात हे गाणे सर्व घराघरात पोहोचले.

आमदार निलेश लंके यांना ही चिमुकल्या श्री चे मोठे अप्रुप वाटले. त्यांनी फोन करून त्याचे कौतुक केले.अनेकांनी श्री मोठेपणी मोठा ख्यातनाम गायक होईल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.