Take a fresh look at your lifestyle.

तिखोल येथील विज पुरवठा सुरळीत करावा !

माजी सभापती अरुणराव ठाणगे व ग्रामस्थांची मागणी.

पारनेर : तालुक्यातील कान्हुर पठार सबस्टेशन अंतर्गत तिखोल येथे ८५ द.ल.घ.फु.क्षमतेचा लघु पाटबंधारा तलाव असलेमुळे बागायती पिके वाटाणा, कांदे व इतर भाजी पाला मोठ्या प्रमाणात असल्याने विज पुरवठ्याची गरज असते.परंतु विज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्या मुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या मुळे तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे व ग्रामस्थांनी केली.
या प्रसंगी माजी सरपंच सुभाष ठाणगे,मा.चेअरमन नागचंद ठाणगे,अश्र्वीन मंचरे,सेवानिवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मणराव ठाणगे,राजु ठाणगे,शिवाजी ठाणगे,बाळासाहेब ठाणगे,सुनिल शेठ ठाणगे, अशोक ठाणगे,गणेश ठाणगे, सुहास ठाणगे,भाऊसाहेब ठाणगे,रामदास ठाणगे,आनंदा ठाणगे,संकेत ठाणगे,अंबादास ठाणगे,मेजर सुनिल ठाणगे,मेजर योगेश ठाणगे,पोपट मंचरे, सतीश मंचरे,अशोक सावळेराम ठाणगे,योगेश ठाणगे,किरण सुंबरे,विनायक साळवे,संपत ठाणगे,राहुल ठाणगे,रावसाहेब मंचरे,अनिल ठाणगे,संतोष ठाणगे,अप्पा ठाणगे,अमोल मंचरे,किरण ठाणगे व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या प्रसंगी सहायक अभियंता श्री.आडभाई,भुजबळ ,लाईनमन संदिप पवार यांनी शेतकऱ्यांच्या विज पुरवठा संदर्भातील भावना समजावून घेतल्या व साधारण पाच ते सहा मार्च पर्यंत विज पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले. व इतर काही ज्या अडचणी आहेत त्या तातडीने सोडवण्यात येतील असे अश्र्वासन दिले.