Take a fresh look at your lifestyle.

महाशिवरात्री स्पेशल : मसालेदार उपवासाच्या पिठाची टिक्की बनवा!

जाणून घ्या,चविष्ट रेसिपी.

आज महाशिवरात्री. अशा वेळी उपवास करताना मसालेदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर वरईच्या तांदळाची किंवा उपवासाच्या पिठापासून बनवलेली चटपटीत टिक्की करून पहा. ही चविष्ट रेसिपी कशी बनते? पाहूयात…
साहित्य : 1 कप वरईचा तांदूळ, 2 उकडलेले बटाटे, चवीनुसार सैंधव मीठ, 1 टीस्पून काळी मिरी, 1 हिरवी मिरची, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार तूप.
कृती : सर्वप्रथम वरईचा तांदूळ थोडा वेळ भिजवा. त्याचे पाणी वेगळे करून बारीक वाटून घ्या. या पेस्टमध्ये सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. या मिश्रणाला टिक्कीचा आकार देत टिक्की तयार करा. आता गॅसवर नॉन स्टिक पॅन गरम करून त्यात थोडं तूप लावून सर्व टिक्की एक-एक करून मंद आचेवर बेक करा. टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत बेक करा आणि प्लेटमध्ये काढून हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.