Take a fresh look at your lifestyle.

आता फोन -पे वापरणे होणार महाग !

यूजर्सच्या खिशाला लागणार कात्री !

 

नवी दिल्ली : कोणताही लहान -मोठा आर्थिक व्यवहार करण्यापासून ते ऑनलाईन वस्तू ऑर्डर करण्यासाठी आता प्रत्येक जणचं फोनपे वॉलेटचा वापर करीत आहेत. अनेक वापरकर्ते क्रेडिट कार्डवरून फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. दरम्यान, आता फोनपे वापरणे महाग झाले आहे.

किराणा दुकानातून माल खरेदी करणे, वीज बिल, पाणी पट्टी भरणे,मोबाईल,डी.टी.एच रिचार्ज करणे,गॅस सिलेंडर बुक करणे आदी कामे फोन पे वर केली जातात. कोरोना काळापासून तर फोन पे चा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे.

2 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्कफोनपे अ‍ॅपवर दिलेल्या माहितीनुसार, आता जर युजर्संनी क्रेडिट कार्डमधून फोनपे वॉलेटमध्ये 100 रुपये अ‍ॅड केले तर त्यांना 2.06 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर त्याने क्रेडिट कार्डद्वारे 200 रुपये जोडले तर त्याला 4.13 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. तसेच, 300 रुपये अॅड केले, तर त्याला 6.19 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, हा नियम नुकताच अंमलात आला आहे. मात्र, फोनपे वॉलेटमध्ये यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अ‍ॅड करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.