Take a fresh look at your lifestyle.

असं करा पैशाचं नियोजन !

आर्थिक संकट कायमचं दूर होईल!

विशेषतः कोरोनामुळे लोकांना आता आर्थिक नियोजनाचे महत्त्व कळून चुकले आहे. पुढील आर्थिक वर्ष अर्था त2022-23 सुरू होण्यापूर्वी आर्थिक नियोजन तयार करा जेणेकरून वर्षभर पैशाचे व्यवस्थापन करणे शक्य येईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत…
बजेट तपासा : नेहमी तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवा. यावरून तुम्ही कुठे आणि किती खर्च करत आहात? हे समजते. दरम्यान खर्च कुठे कमी करणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. यासाठी तुम्ही अ‍ॅपची देखील मदत घेऊ शकता.
आर्थिक उद्दिष्ट तपासा : सतत तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे पुनरावलोकन करा. नवीन वर्ष सुरू झाल्यावर, तुम्ही त्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करू शकता. यासह, नवीन ध्येय जोडू शकता.
गुंतवणूक पोर्टफोलिओ तपासा : गुंतवणूक सुरू करण्यासाठी आणि मजबूत गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. आपल्याकडे आधीपासूनच पोर्टफोलिओ असल्यास, त्याचे पुनरावलोकन करा. तुमच्या पोर्टफोलिओचा ट्रॅक रेकॉर्ड वेळोवेळी तपासून, तुमची गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे? हे तुम्हाला कळेल.
विमा संरक्षण असू द्या : आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा आणि जीवन विमा खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा विमा कालबाह्य होत असेल तर त्याचे नूतनीकरण करून घ्या. तुमचे कुटुंब अलीकडे लग्नामुळे किंवा मुलांच्या जन्मामुळे वाढले असेल तर विम्यामध्ये सुधारणा करून घ्या.
कर नियोजन करा : हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर नियोजन केले तर तुम्हाला गुंतवणुकीची गणना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त कर वाचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.