Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸28 फेब्रुवारी 2022

0

 

▪️मेष : हुकुमशाहीपणा दूर सारावा. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल.
▪️वृषभ : नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल.
▪️मिथुन : जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
▪️कर्क : नावलौकिकास पात्र व्हाल. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
▪️सिंह : काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे.
▪️कन्या : नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल.
▪️तूळ : कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल. जवळचा प्रवास जपून करावा.
▪️वृश्चिक : चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील. काही गोष्टींचे मनन करावे लागेल.
▪️धनू : स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल.
▪️मकर : स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे.
▪️कुंभ : काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या.
▪️मीन : आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल.
Leave A Reply

Your email address will not be published.