Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸27 फेब्रुवारी 2022 

▪️मेष : हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. 
▪️वृषभ : अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.
▪️मिथुन : पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
▪️कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा.
▪️सिंह : चोरांपासून सावध राहावे. ओळखीचा फायदा होईल. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका.
▪️कन्या : समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. जोडीदाराचा निश्चय मान्य करावा लागेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा.
▪️तूळ : कामाचा उरक वाढेल. हातातील अधिकार वापरावेत. मनोभंगाला सामोरे जावे लागू शकते. क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका.
▪️वृश्चिक : उपासनेला चांगले बळ मिळेल. कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. बौद्धिक दिमाख दाखवाल.
▪️धनू : गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. नातेवाईकांचा विरोध होवू शकतो. मन:शांती जपण्याचा प्रयत्न करावा.
▪️मकर : कोणाच्याही मदती शिवाय कामे पार पाडाल. योग्य तारतम्य बुद्धी वापरावी. प्रांजळपणे वागणे ठेवाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.
▪️कुंभ : बढतीची चिन्हे दिसून येतील. घशाचे विकार होण्याची शक्यता आहे. बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल.
▪️मीन : अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे.