Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸26 फेब्रुवारी 2022

0
▪️मेष : दानाचे महत्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल.
▪️वृषभ : तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात.
▪️मिथुन : उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात.
▪️कर्क : जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे.
▪️सिंह : र्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे.
▪️कन्या : रेस, जुगार यातून लाभ संभवतो. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.
▪️तूळ : मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे.
▪️वृश्चिक : उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
▪️धनू : विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका.
▪️मकर : जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. लोकनिंदेला बळी पडू नका.
▪️कुंभ : बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. कसलाही वाद वाढू देवू नका.
▪️मीन : वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा.
Leave A Reply

Your email address will not be published.