Take a fresh look at your lifestyle.

आजपासून पितृ पक्षाला सुरुवात !

 'या' गोष्टींची काळजी घ्या!

 

यंदा पितृ पक्ष आज 20 सप्टेंबर 2021 पासून ते पितृ अमावास्येपर्यंत म्हणजेच 06 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या दरम्यान पूर्वजांना तर्पण अर्पण केले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, तर्पण कुटुंबातील सदस्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते.

असे मानले जाते की, श्राद्ध पक्षाच्या वेळी पूर्वज पृथ्वीवर येतात. तसेच त्यांच्या कुटुंबाकडून तर्पण प्राप्त केल्यानंतर त्यांना आशीर्वाद देतात. असे केल्याने घरात सुख -शांती राहते. जर एखाद्याने मृत कुटुंबातील सदस्यांना तर्पण दिले नाही तर पित्राला राग येतो, तसेच कुंडलीत पितृ दोष येतो. आज पाहूयात पितृपक्षात कोणती कामे केल्याने पितर प्रसन्न होतील…

🔸पितर प्रसन्न व्हावे यासाठी ‘हे’ करा! :

● पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान करा.

● या दिवशी तेल, सोने, तूप, चांदी, गूळ, मीठ आणि फळे दान करा.

● या दिवशी ब्राह्मणांना अन्न द्या.

● केवळ तिथीनुसार श्राद्ध पक्षात दान करा. अशाने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील.

● आपल्याकडून नकळत कोणतीही चूक केली झाली तर पूर्वजांकडून क्षमा मागू शकता.

● आपल्या पूर्वजांची पूजा करताना, त्यांच्या चित्रावर टिळा लावा.

● पितराच्या तिथीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरीब लोकांना अन्न वाटप करा आणि चुकांची क्षमा मागा. अशाने पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील.

🔸अशी पूजा करा :

● तुमचे पूर्वज पौर्णिमेच्या दिवशी गेले असतील तर त्यांचे श्राद्ध ऋषींना समर्पित आहे.

● या दिवशी पितरांचे चित्र समोर ठेवून तर्पण करा.

● पूर्वजांच्या चित्रावर चंदनाची माळ आणि चंदनाचा टिळा लावून पूर्वजांना खीर अर्पण करा.

● पूर्वजांच्या नावाने पिंडदान करा आणि नंतर कावळे, गायी आणि कुत्र्यांना प्रसाद खाऊ घाला. यानंतर, ब्राह्मणांना खाऊ घालून नंतर ते स्वतः खा.

सर्व पितृ श्राद्ध : या दिवशी पूर्वजांचे तर्पण केले जाते, ज्यांचे अकाली निधन झाले आहे किंवा ज्यांची तारीख माहित नाही. लक्षात घ्या, पूर्वजांचे पिंडदान किंवा श्राद्ध करणे महत्वाचे आहे.

▪️श्राद्धात ‘ही’ खबरदारी घ्या :

● या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

● या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मासे खाणे टाळा.

● घरातील प्रत्येक सदस्याचे हाताने दिवंगत आत्म्यासाठी दान करावे.

● या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न अर्पण करा. आपल्या क्षमतेनुसार दान करा.