Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल पे’वर मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज !

असा करावा लागणार अर्ज!

आता गुगल पेनं 1 लाख रुपयांपर्यंत झटपट कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे. यासाठी गुगल पेनं डीएमआय फायनान्स लिमिटेडसोबत करार केला आहे. यासार दोन्ही कंपन्या डिजिटल वैयक्तिक कर्ज लोन देणार आहे.
कर्जाबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात…
● आपल्याला 1 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज डिजिटिली पद्धतीने मिळू शकते.
● कर्ज फेडण्यासाठी आपल्याला एकूण 36 महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे.
● डीएमआय फायनान्स लिमिटेडच्या भागीदारीसह देशातील 15 हजार पिन कोड्सवर ही सुविधा उपलब्ध होईल.
● या सुविधेचा लबाग घेण्यासाठी ग्राहकांकडे गुगल पे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर क्रेडिट हिस्ट्री देखील चांगली असणं आवश्यक आहे.
● पूर्व-पात्र वापरकर्ते हे कर्ज डीएमआय फायनान्स लिमिटेडकडून घेऊ शकतील.
● ग्राहकाला कर्ज पूर्व मंजूर असेल तर कर्जाच्या अर्जावर रिअल टाईममध्ये प्रक्रिया होईल.
● अगदी काही वेळातच तुम्ही अर्ज केलेल्या खात्यात 1 लाख रुपये जमा होतील.
कर्जासाठी अर्ज कसा करायचा? :
● सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल पे सुरु करा.
● त्यानंतर Pre Approved Loan साठी तुम्ही एलिजिबल असाल तर Promotions च्या खाली Money हा ऑप्शन दिसेल.

● आता Loan या ऑप्शनवर क्लिक करा.
● आता Offers चा एक ऑप्शन खुला होईल. यात DMI हा ऑप्शन दिसेल.
● यामध्ये कोणती व्यक्ती कमीत-कमी किती रक्कम आणि सर्वाधिक किती रकमेचं लोन घेऊ शकेल? हे दिसेल.
● यानंतर Application प्रोसेस पूर्ण करा.