Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्यार्थी घडतात !

जि.प.सदस्या राणीताई लंके यांचे मत.

पारनेर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर मूल्य संस्कार घडत असतात आणि त्याच संस्काराच्या शिदोरीवर जीवनात विद्यार्थी घडत असतात असे मत जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई निलेश लंके यांनी व्यक्त केले.
टाकळी ढोकेश्वर येथील श्री.ढोकेश्वर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ तिखोल येथे झाला. या शिबिराचे उद्घाटन सौ.राणीताई लंके यांच्या हस्ते तर पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सौ.लंके बोलत होत्या.
सौ.लंके म्हणाल्या की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा अतिशय महत्त्वाचा वाटा असून विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये त्याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन सौ. लंके यांनी केले.तसेच शिबिर कालावधीमध्ये स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा गैरसोय होऊ नये तसेच काही अडचण आल्यास कोणत्याही क्षणी संपर्क साधावा , त्याचवेळी तुमची मदत केली जाईल असे आश्वासनही राणीताई यांनी दिले.
प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिबिरांमधून विद्यार्थी घडतात त्यांना शिस्त लागते आणि तडजोड करण्याची शक्ती शिबिरांमधून मिळते असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व महात्मा गांधी यांनी खेडेगावातील सोयीसुविधा व इतर गोष्टींबाबत बघितलेले स्वप्न युवकांनी पूर्ण करावे असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना मागील भूमिका स्पष्ट केली.
तिखोल ग्रामस्थांच्या वतीने निलेश लंके प्रतिष्ठानचे टाकळी ढोकेश्वर गण प्रमुख संदिप ठाणगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व महाविद्यालयात गाव आणि गावातील सर्व युवक सर्वोतोपरी सहकार्य करतील कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही. कोणत्याही क्षणी अडचण भासल्यास तत्पर मदत केली जाईल अशी ग्वाही देऊन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठानचे टाकळी ढोकेश्वर गण प्रमुख संदीप ठाणगे, सरपंच अनिल तांबडे,उपसरपंच चांद इनामदार ग्रामपंचायत सदस्या रोहिणी संदीप ठाणगे ,अनुसया साळवे बाबासाहेब मंचरे, माजी सरपंच सुभाष ठाणगे, शिवाजी ठाणगे गुरुजी ,तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील ठाणगे, संकेत किसन ठाणगे, अजित ठाणगे, दिनकर कुटे,ग्रामपंचायत सदस्य राजू ठाणगे शिवाजी विष्णू ठाणगे, संजय वाघ, उत्तम ठाणगे, गणेश भाऊसाहेब ठाणगे, संजय दोरगे, सुनील ठाणगे मेजर ,गणेश ठाणगे मेजर, रावसाहेब मंचरे इत्यादी ग्रामस्थ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक महाविद्यालयातील सहभागी शिबिरार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन कार्यक्रम अधिकारी नामदेव वाल्हेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी लक्ष्मण कोठावळे यांनी मानले कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व यशस्वी करण्यासाठी सौ रुक्मिणी तुतारे यांनी सहकार्य केले.