Take a fresh look at your lifestyle.

एटीएमचा पिन 4 अंकीच का असतो?

'या' मागील कारण जाणून घेऊयात !

विज्ञानाने लावलेल्या विविध शोधांमुळे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य अधिक सुसह्य केलंय. असाच एक शोध म्हणजे एटीएमचा. या शोधामुळे बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी लागणारा आपला वेळ वाचला आहे. मात्र एटीएममधून पैसे काढताना चार अंकी पिन टाकावा लागतो. हा पिन चार अंकी का असतो? याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात…
एटीएम मशीनचा शोध 1969 साली जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन या स्कॉटिश शास्त्रज्ञाने लावला. या शास्त्रज्ञाचा जन्म भारतातच शिलाँग शहरात झाला. शेफर्ड यांनी एटीएम मशीन तयार करून त्यात कोडिंग सिस्टिम बसवली.
सुरुवातीला एटीएम पिन 4 अंकांचा असावा, असा शेफर्ड यांचा प्लॅन नव्हता, उलट तो 6 अंकी ठेवायचा होता. माता जेव्हा शेफर्ड यांनी त्यांची पत्नी कॅरोलिनवर हा प्रयोग प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा-पुन्हा ती 6 अंकांपैकी 2 अंक विसरायची. दरम्यान शेफर्ड यांनी अंदाज लावला की, मानवी मेंदू सहजपणे 6 ऐवजी 4 अंक सहज लक्षात ठेवू शकतो. मग त्यांनी एटीएम पिन चार अंकी ठेवला.
शेफर्ड यांचा 6 अंकी ठेवण्यामागचा उद्देश तो अधिक सुरक्षित करणे हा होता. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 या दरम्यानचा असतो. याचाच अर्थ कोणत्याही एटीएमचा पिन हा 10000 भिन्न पिन नंबरपैकी एकच ठेवता येतो, ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात. अर्थात 4 अंकी पिन सहज हॅक केला जाऊ शकत नसला, तरी तो 6 अंकी पिन पेक्षा कमी सुरक्षित असल्याचे बोलले जाते.