Take a fresh look at your lifestyle.

मनोहरमामा आता करमाळा पोलिसांच्या ताब्यात !

अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला.

 

बारामती : संत बाळुमामाचा अवतार असल्याचे भासवित फसवणूक करणाऱ्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यास बारामती कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसले यानी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, मनोहरमामाला बारामती पोलिसांकडून आता करमाळा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहर भोसले यास ताब्यात घेतले आहे.

बारामतीतील रहिवासी शशिकांत खरात यांच्या वडिलांना अघोरी उपचार केल्याप्रकरणी आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 8 तारखेला मनोहर भोसले आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवर बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 10 तारखेला बारामती पोलिसांनी मनोहर भोसले याला अटक केली होती. सुरवातीला 5 दिवस आणि नंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली होती.

मनोहर भोसलेला बारामती पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. एन. व्ही. रणवीर यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला मनोहर भोसलेचा एक साथीदार ओंकार शिंदे याला बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.

संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली. भोसलेवर करमाळा पोलिसातही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याला बारामती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो पोलिस कोठडीत होता. पोलिस कोठडी संपल्यानंतर काल रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.