Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸25 फेब्रुवारी 2022

▪️मेष : लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो.
▪️वृषभ : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल.
▪️मिथुन : दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हातातील कामात यश येईल.
▪️कर्क : वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल.
▪️सिंह : मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात.
▪️कन्या : चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल. भावंडांशी मतभेद संभवतात.
▪️तूळ : जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील. हातापायास किरकोळ इजा संभवते.
▪️वृश्चिक : घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल.
▪️धनू : प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये. स्वत:मध्ये काही बदल कराल.
▪️मकर : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते. त्रासातून मार्ग निघेल.
▪️कुंभ : सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे. नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा.
▪️मीन : जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.