Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत?

अशी मिळवा सर्व माहिती!

गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जातो. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील खरेदी केले जातात. या मोबाईल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केला तर तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो. तसेच या नंबरचा वापर करून गुन्हेगार बँक खाते देखील रिकामे करू शकतात. ‘आधार’च्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे हे खूपच सोपे आहे. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी कोणी सिम कार्ड घेतले आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक सोप्पी पद्धत सांगत आहोत…
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल सुरू केले आहे. सध्या ही सुविधा फक्त तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यात उपलब्ध आहे. फसवणूक टाळणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या आधारवर रजिस्टर असलेल्या सर्व फोन नंबर्सची माहिती मिळेल. तसेच, एखादा नंबर तुम्हाला अनधिकृत वाटत असल्यास तुम्ही DoT कडे तक्रार करून त्याला ब्लॉक करू शकता.
तसेच, तुमच्या अन्य कागदपत्रांचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जातोय का, हे तपासण्यासाठी क्रेडिट रिपोर्ट पाहा. यामध्ये कोणतीही संशयास्पद रक्कम दिसत नाही ना? हे तपासा. यामध्ये रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलची माहिती मिळते. तुम्हाला जर कोणतीही माहिती संशयास्पद वाटल्यास क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीशी देखील संपर्क साधू शकता किंवा पोलिसांत तक्रार दाखल करू शकता.