Take a fresh look at your lifestyle.

हि’ चिमुरडी थेट गाईलाच पिते! 

नक्की काय आहे सत्य घटना? वाचा सविस्तर 

 

करमाळा : एक चिमुकली थेट गाईच्या कासेला तोंड लावून रोजच दूध पीते. ही चमत्कारिक गोष्ट सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम या गावात अनुभवायला मिळत आहे.

सविस्तर असे कि, परमेश्वर तळेकर यांनी देशी गाईचे संगोपन केले आहे. याच परमेश्वर तळेकरांची नात म्हणजे सई. या सईला आजोबांप्रमाणे गाईंचा विशेष लळा लागला होता. एके दिवशी सईला तिचे आजोबा गाईचे दूध पिण्यासाठी गोठ्यात घेऊन गेले आणि तिचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लावले. मग गाईने सईला दुध पिण्यासाठी पान्हा सोडला आणि सई गाईला पिऊ लागली.

हे दृश्य पाहून आजोबा खुश झाले आणि आता आजघडीला सईला कधीही दूध प्यावे वाटले तर तिला कपिला गाय तिच्या जवळ येऊन उभी राहून तिला दूध पिण्यास देते. गेल्या ८ महिन्यापासून सईला गायीचे दुध कासेला तोंड लावून प्यायची सवय आहे.

या सवयीमुळे सई आता कपात किंवा ग्लास मध्ये दिलेले दूध सई पीत नाही. तसेच दुसरेही ती काही खात नाही. आजोबांची लाडकी सई आता दोन वर्षाची झाली मात्र आजही ती थेट गाई गोठा गाठते. आजोबा परमेश्वर यांच्या मते देशी गाईच्या दूध पिण्याने सईमध्ये झपाट्याने सुधारणा दिसत आहे. वयाच्या मानाने सईमध्ये शारीरिक प्रगतीही चांगली होत आहे.