Take a fresh look at your lifestyle.

सेफ्टी पिनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

...त्यामुळेच 'सेफ्टी पिन' असे म्हटले जाते.

दात साफ करताना असो की कपडे फाटल्यावर जोडण्याकरता असो बटण म्हणून सेफ्टी पिनचा वापर केला जातो. या एका छोट्या तारेच्या तुकड्याचा अनेकदा वापर होतो. मात्र या सेफ्टी पिनचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? याच्या नावामागची गोष्ट काय आहे? चला, तर आज त्याबाबत जाणून घेऊयात… 
सेफ्टी पिनचा शोध वॉल्टर हंट यांनी लावला होता. वॉल्टर छोट्या-छोट्या गोष्टींकरता ओळखले जातात. एकेकाळी ते कर्जबाजारी होतं. ते कमी करण्यासाठी ते छोट्या-छोट्या गोष्टींचा शोध लावत. असाच सेफ्टी पिनचा देखील शोध लागलाय. सेफ्टी पिनचे पेटंट घेऊन ते 400 डॉलला विकले गेले होते. सेफ्टी पिनसोबत त्यांनी शिलाई मशीन, पेन, स्टोन, चाकू यासारख्या गोष्टींचा देखील शोध लावलाय.
एकदा पत्नीला खूष करताना त्यांच्या हातून सेफ्टी पिनचा शोध लागला. त्याचे झाले असे की, पत्नीच्या ड्रेसमधील बटण तुटले होते. त्यावेळी त्यांनी काम करणाऱ्या वायरने चकरा मारल्या. त्यांनी ही सेफ्टी पिन वायरपासूनच बनवली ज्याला ड्रेस पिन म्हणतात.
बदलत्या काळातही तिची उपयुक्तता कमी न झाल्याने तिच्या डिझाईनमध्ये छेडछाड न करता कंपन्यांनी महिलांच्या साडीच्या रंगानुसार ती रंगीबेरंगी केली, हे व्हिएहश. हंट यांच्या शोधानंतर तारेच्या जागी पिनचा वापर करण्यात आला. या पिनमुळे लोकांची बोटे सुरक्षित आहेत. त्यामुळेच या पिनला सेफ्टी पिन म्हटलं जातं.