Take a fresh look at your lifestyle.

सुजित झावरेंनी व्यक्त केली तालुक्याच्या राजकारणातील ‘ही’ खंत !

आमचा लढा वैचारिक आहे ; वैयक्तिक नव्हे.

 

 

पारनेर : तालुक्यात यापूर्वी राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्दावर चालायची परंतू गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्द्यावर नव्हे तर वैयक्तिक झाल्याची खंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील जाधववाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सुजित झावरे यांच्या हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ.आझाद ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी झावरे बोलत होते.

सुजित झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक आर्थिक नियोजनातून जाधववाडी येथे २०.०० लक्ष रु कोल्हापूरी पध्दतीच्या बंधारा मंजूर करण्यात आला आहे. सदर बंधारासाठी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ यांनी सुजित झावरे यांच्याकडे मागणी केली होती. अवघ्या सहा महिन्याच्या आत बंधारा मंजूर करण्यात आला. यावेळी नदीजोड प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झावरे यांना गौरविण्यात आल्याबद्दल जाधववाडी- राऊतवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सुजित झावरे म्हणाले की, तालुक्याच्या राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्दांवरुन वैयक्तिक पातळीवर गेली आहे ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तालुक्यातील राजकारणात आमचा लढा हा वैचारिक आहे वैयक्तिक नव्हे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाराम बेलकर, सुनील थोरात, सुपा गावचे उपसरपंच सागर मैड, वडनेर हवेलीचे सरपंच लहुशेठ भालेकर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे, माजी सरपंच शिवाजी औटी, सुभाष बेलोटे, माजी सरपंच सुभाष सुरुडे, बाबासाहेब चेडे, सचिन ठुबे, माजी सरपंच सतीश पिंपरकर, रवींद्र पाडळकर सोपान करकंडे, बाळासाहेब दिघे, अशोक राऊत, बाळासाहेब लंके, बन्सी महाराज जाधव, युवराज मोरे, सुभाष दुधाडे, संतोष दिघे, विवेक मोरे, बाळासाहेब सपकाळ, मोमीन भाई, तसेच जाधववाडी – राऊतवाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, उपसरपंच उषाताई जाधव , ग्रामपंचायत सदस्य वैभव जाधव, संतोष जाधव, पोपट सोमवंशी, साळूबाई जाधव, अलका जाधव, पोपट जाधव, पांढुरंग सोमवंशी, रामदास सोमवंशी, शंकर जाधव, योगीता राऊत, पुष्पा राऊत, राणी सुर्यवंशी गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.