Take a fresh look at your lifestyle.

तुम्हाला प्रवासात उलट्या होतात का ?

होत असतील तर 'या' टिप्स फॉलो करा!

विविध करणास्तव प्रवास करताना अनेकांना उलट्यांचा त्रास होतो. यामुळे काही लोक अक्षरशः प्रवास करणे टाळतात. परंतु आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे उलट्या थांबवणे शक्य आहे. त्यासाठी खालील टिप्स तुम्हाला मदत करतील…  
▪️ आलं पाण्यात हलके गरम करूनही पिऊ शकता.
▪️ लिंबू चोख, याने उलट्या थांबण्यास मदत होईल.
▪️ एक कप गरम पाण्यात एक चमचा लवंग उकळून गाळून प्या.
▪️ पाणी किंवा लिंबूपाणी प्या. परंतु हे पाणी थोडे-थोडे करुन प्या.
▪️ मोठा श्वास घ्या आणि काही चांगल्या क्षणांचा विचार करण्याचा प्रयत्न करा. ही पद्धत खूप प्रभावी आहे.
▪️ संत्र्याचा रस पिऊ शकता किंवा संत्री खाऊ शकता.
▪️ एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळून घ्या.
▪️ मीठ आणि साखरेचे पाणी पिऊ शकता.
टीप : वरील लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे.