Take a fresh look at your lifestyle.

‘श्री.समर्थ मल्टीसर्व्हिसेस’ पेट्रोल पंप ठरला राज्यात अग्रेसर !

कैलास गाडीलकर 'सीएनजी-चॅम्प' पुरस्काराने सन्मानित.

पारनेर : नगर पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्या नजिक असणाऱ्या म्हसणे फाटा येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. चे श्री समर्थ मल्टी सर्व्हिसेस या पेट्रोल पंपाची गुणवत्ता व सेवेच्या माध्यमातून नेहमी उत्तम चर्चा होत आली आहे. सदर पंपाचे चालक कैलास गाडीलकर हे उच्चशिक्षीत असून या पेट्रोलियम क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव व गुणवत्ता जपण्याची हातोटी यामुळे श्री. गाडीलकर यांची संपूर्ण राज्यभर चर्चा आहे.
श्री समर्थ मल्टीसर्व्हिसेसच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षापासून पेट्रोलियम क्षेत्रात कार्यरत असणारे या पेट्रोल पंपाचे संचालक कैलास गाडीलकर यांनी भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम राबवत भारत पेट्रोल पंप क्षेत्रात कार्य करत आले आहेत.पेट्रोल / डिझेल पंपाच्या जोडीला सी.एन.जी. पंप हा अहमदनगर जिल्ह्यातील पहिला पंप सुरु करण्यामध्ये त्यांना यश मिळाले.वर्षभरापूर्वी या सीएनजी पंपाचा शुभारंभ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह भारत पेट्रोलियमच्या देशातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सीएनजी पंपाचा शुभारंभ करण्यात आला होता.
पेट्रोल व डिझेलचे वाढते दर लक्षात घेता भारत सरकारने सीएनजी गॅस वर चालणारे अनेक वाहने बाजारात आणल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सीएनजी पंप नगर जिल्ह्यात सुरू करायचा निर्धार केला.व अल्पावधीतच त्या पंपाच्या माध्यमातून व डिझेल / पेट्रोल पंपाची गुणवत्ता व सेवेच्या योगदानामुळे श्री समर्थ मल्टी सर्विसेस या पंपाची दखल भारत पेट्रोलियमने घेत व त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे नुकत्याच लोणावळा येथे झालेल्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण समारंभात बी.पी.सी.एल. चे जनरल मॅनेजर (पश्चिम ) के.रवी तसेच श्री.रमण मलिक ( महाराष्ट्र राज्य प्रमुख ) यांच्या शुभ हस्ते ” सीएनजी चॅम्प – महाराष्ट्र आणि गोवा राज्य ” या राज्यस्तरीय पुरस्काराने संचालक कैलास गाडीलकर यांना सन्मानित करण्यात आले.
भारत पेट्रोलियमचे अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रीय प्रबंधक दिनेश गाडगीळ ,बी.जी.आर.एल. चे सी.जी.डी. प्रमुख श्रीपाद मांडके , आमदार निलेश लंके यांच्या सह पारनेर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संचालक कैलास गाडीलकर यांचे अभिनंदन केले.
श्री.समर्थ मल्टीसर्व्हिसेस या पंपाला यापूर्वीही भारत पेट्रोलियम कंपनीकडून यापूर्वीही अनेक मानांकने देऊन सन्मानित करण्यात आले होते . व श्री समर्थ मल्टी सर्व्हिसेसच्या गुणवत्तेमुळे व ग्राहक सेवेमुळे संचालक कैलास गाडीलकर यांचा म्हसणे फाटा येथील श्री. समर्थ मल्टी सर्व्हिसेस हे प्रकाश झोतात आले आहे. सदर पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी महाराष्ट्र व गोवा राज्यातील बी.पी.सी.एल . कंपनीचे अधिकारी व अनेक मान्यवर पेट्रोल पंपचालक या वेळी उपस्थित होते .