Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हे’ विचार कायम प्रेरणा देतात!

शिवजयंती निमित्त महाराजांचे विचार वाचाच !

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. हे एक असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे जे आजही आणि सदैव आपल्या विचारांनी नव्या पिढीला प्रेरणा देत राहतील. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात…
1. कधीही कोणापुढेही आपली मान झुकवू नका, नेहमी ताठ मानेने जागा.
2. जेव्हा निश्चय पक्का असेल तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासेल.
3. एखाद्या बलवान शत्रूला आपण आपल्या धैर्याने आणि दृढ इच्छाशक्तीने पराभूत करू शकतो.
4. फक्त शक्ती असल्याने कोणीही शासक बानू शकत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती असणेही महत्त्वाचे आहे.
5. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा पुरेपूर विचार करणे गरजेचे आहे.
6. आपण जे काम करतो त्याचे अनुकरण पुढील पिढ्या करतात.
7. जो व्यक्ती कठीण काळातही दृढ इच्छाशक्तीने कार्य करत राहतो, त्याचा काळ आपसूकच बदलतो.
8. जरी आंब्याच्या झाडाला दगड मारला तरी ते झाड गोडच आंबे लोकांना देतं. मी राजा असून त्या झाडांपेक्षा जास्त दयाळू आणि सहनशील का असू शकत नाही.
9. महिलांना मिळालेल्या अधिकाऱ्यांपैकी आई होण्याचा अधिकार सगळ्यात मोठा.
10. प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यायला हवं. कारण युद्धाच्या काळात एखादी गोष्ट शक्तीने मिळवता आली नाही, तर त्याठिकाणी ज्ञानाचा आणि युक्तीचा वापर करून मिळवता येतं आणि ज्ञान शिक्षणातून मिळतं.