Take a fresh look at your lifestyle.

कान्हूर पठार मध्ये तरसाची शिकार !

एकास अटक ,साथीदार फरार ?

पारनेर : तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस प्रजातीच्या वन्यजीवाची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उखडकीस आला असून वनविभागाने कारवाई करून सदर तरसाचे भाजलेले मांस,कातडी व पाय जप्त करून एकास अटक केली आहे परंतु त्याच्या साथीदारास फरार असल्याची माहिती मिळत आहे . 
याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असून त्याला खाण्याची तयारी असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर या ठिकाणी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  भाळवणी   परिक्षेत्राचे सी.ए.रोडे व संदीप भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी तरस जातीच्या वन्यजीवांचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली असून सदर मृत तरस च्या अवयवांचा पंचनामा करून   फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय ओव्हळ यांनी दिली
तसेच वनविभागाच्या वतीने  कान्हूर पठार येथील सुरेश दत्तू शिंदे यास अटक केली आहे तसेच तरसाची शिकार करताना असणारा साथीदार विरोली मधील असल्याची प्राथमिक माहिती असून सुरेश शिंदे विरोधात वन्यजीव  संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबतची फिर्याद कान्हूर पठारच्या वनसंरक्षक निर्मला भाऊसाहेब शिंदे यांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप करीत आहेत
दरम्यान सदर आरोपी सुरेश दत्तू शिंदे यास पारनेर न्यायालयात हजर केले असत वन विभागाने त्याला  चौकशीसाठी १४ दिवसांची वन विभागाची कोठडी ची मागणी केली होती पण पारनेर नायालयाने २३ तारखेपर्यंत सहा दिवसांची वनविभागाची कोठडी दिली आहे.