Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही निळ्या रस्त्यांचा देश पाहिला का ? 

नसेल तर नक्की वाचा !

शीर्षक वाचून असे वाटले असेल हा देश नेमका कोणता? तेथे असे रस्ते का आहेत? चला, तर त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.
तर या देशाचे नाव आहे कतार. हा असा देश जेथील जवळपास सर्वच रस्ते निळ्या रंगाचे आहेत. हा रंग येथील रस्त्यांचे सौंदर्य तर वाढवतोच. सोबत असे वाटते हे रस्ते जणू आकाशाला भिडले आहेत. कतारमध्ये हे रस्ते 2019 नंतर बांधले गेले आहेत. त्या अगोदर येथेही काळ्या किंवा राखाडी रंगाचेच रस्ते होते.
ग्लोबल वॉर्मिंगची जगभर सुरु असलेला सर्वात एक मोठा प्रश्न होऊन बसला आहे. कतारमध्ये याच उद्देशाने रस्ते निळ्या रंगांचे केले गेले आहेत. कारण हे रस्ते तापमानाचा बॅलन्स साधण्याचे काम करतात. काळे किंवा राखाडी रस्ते सर्वाधिक रेडीएशन शोषून घेतल्याने अधिक तापतात. दरम्यान अश्या रस्त्यांवर झाडे नसतील तर जास्त प्रमाणात उष्णता तयार होते. तुलनेने निळे रस्ते फार तापत नाहीत. कतार प्रमाणेच जगातील इतरही काही शहरात असे निळे रस्ते तयार केले गेलेत. त्यात लास वेगास, मक्का आणि टोक्यो यांचा समावेश आहे.