Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 20 सप्टेंबर 2021

0

 

▪️मेष : वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. ठरवलेले विचार अचानक बदलू नका.

▪️वृषभ : धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. शेजार्‍यांची मदत घेता येईल.

▪️मिथुन : मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य.

▪️कर्क : दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल.

▪️सिंह : नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल.

▪️कन्या : लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल.

▪️तूळ : स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल.

▪️वृश्चिक : मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा.

▪️धनु : संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.

▪️मकर : योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे.

▪️कुंभ : आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा.

▪️मीन : उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Leave A Reply

Your email address will not be published.