Take a fresh look at your lifestyle.

सतत मान दुखतेय का ? 

मग आजच 'या' गोष्टी बदला...!

हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक दुखणी वाढली आहेत. ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या आरोग्याकडे आणि शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करु लागलो आहोत. दरम्यान अनेकांचीच तक्रार असते, की मान आणि पाठ प्रचंड दुखतेय. यासाठी काही गोष्टींमध्ये बदल करणं आणि त्या अनुशंगाने आपल्याला सवयी लावणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. आज त्याबाबत जाणून घेऊयात…
▪️ चुकीच्या पद्धतीनं, पोटावर झोपणं टाळा.
▪️ रात्री किमान 8 तास तुम्ही उशीवर डोकं ठेवून झोपता. त्यामुळे उशी ही चांगलीच असावी.
▪️ सतत दीर्घकाळासाठी बसून राहणं मानेसाठी वेदनादायी ठरतं. यामुळे नर्व कंप्रेशन आणि ऑस्टियोअर्थराइटिस असे त्रास उदभवतात. दरम्यान डॉक्टरांचं मार्गदर्शन फायद्याचं ठरतं.
▪️ सकाळी उठल्यानंतर मान हळुवारपणे डाव्या आणि उजव्या बाजुला फिरवणं यामुळे मानेच्या वेदना नक्कीच कमी होतील.
▪️ मान गोलाकार पद्धतीने पाच वेळा उजवीकडून आणि पाच वेळा डावीकडून फिरवणंसुद्धा फायद्याचं ठरतं.
▪️ वेदना होणाऱ्या भागात आईस पॅक किंवा हिट पॅकचा वापर फायद्याचा ठरतो.
टीप : वर दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, हे ध्यानात घ्यावे.