Take a fresh look at your lifestyle.

12 वर्षांपासून ‘हा’ माणूस फक्त 30 मिनिटे झोपतोय…

कारण वाचून तुम्ही थक्क व्हाल!

जपानमधील एका व्यक्तीने केलेला दावा ऐकून तुम्हाला म्हणाल हे शक्यच नाही. कारण हा माणूस दिवसातील फक्त 30 मिनिटेच झोपतो. त्याचा हा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून सुरु आहे. यामुळे त्याने केलेल्या दाव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

या व्यक्तीचे नाव आहे डाईसुके होरी. त्याने आपली 8 तासांची झोप प्रयत्न करून 30 मिनिटांवर आणलीय. या 30 मिनिटात योग्य प्रकारे झोप घेतल्याने 8 तासांची झोप पूर्ण होत असल्याचे तो सांगतो. तसेच आपण देखील योग्य प्रयत्न केल्यावर आपल्या झोपेची वेळ कमी करू शकतो, असा दावाही त्यांनी केलाय.

आपले झोप कमी करण्याचे तंत्र सगळ्यांना शिकवण्यासाठी होरीने ‘जपान शॉर्ट-स्लीपर असोशिएशन’ स्थापन केलीय. या संस्थेचा तो अध्यक्ष असून झोप करण्याचे तंत्र तो अनेकांना शिकवत असतो. अनेकजण वेळेचे कारण सांगतात. मात्र त्यांनी झोप कमी करण्याचे तंत्र आत्मसात केले तर त्यांना वेळेची कमतरता भासणार नाही, असेही होरी सांगतो.

आपला दावा खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने काही दिवस एका पथकाला घरी ठेवले होते. या पथकाच्या पाहणीत होरी फक्त 30 मिनिटे झोपून सर्व काम सुरू करत असल्याचे दिसले. 30 मिनिटे झोप घेऊन होरी दिवसभर ते उत्साही असतो. तो थकलेला किंवा कंटाळलेला दिसत नाही.