Take a fresh look at your lifestyle.

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी पुरविला ‘त्याचा’ बालहट्ट !

छोटया संचितला म्हणाले.. फोड नारळ !

 

सांगली: सायेब… मी पण फोडू का नारळ?… फोडू का नारळ… असा बाल हट्ट एका 6 वर्षाच्या एका चिमुरड्या मुलाने थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांकडेच धरला. लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटलांनी लगेचच त्याची इच्छा पूर्ण देखील केली.

मंत्री जयंत पाटील यांनी लहानग्या संचितच्या हातात नारळ दिला आणि सांगितलं फोड नारळ. त्यामुळे संचितने नारळ फोडला आणि त्याची नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याची इच्छाही या निमित्ताने पूर्ण झाली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षाच्या संचित गावडे हा चिमुरडा त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंतराव पाटलांकडे व्यक्त केली.

जयंत पाटील यांनी या लहानग्याची इच्छा पूर्ण केली. बर्‍याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. राज्याचे मंत्री पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली.