Take a fresh look at your lifestyle.

शिवाजीशेठ बेलकरांचा फंडा…जुन्नर तालुक्यातही रोवला झेंडा !

सहकारी सेवा संस्था निवडणूकीत निर्विवाद वर्चस्व.

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीशेठ बेलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जुन्नर तालुक्यातील आणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर रंगदास स्वामी भैरवनाथ शेतकरी सर्वसामान्य या पॅनेलने एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. या निवणूकीच्या निमित्ताने शांत,संयमी स्वभावाच्या श्री.बेलकर यांनी परजिल्ह्यातही सहकारात आपल्या कार्यकर्तुत्वाचा झेंडा रोवला आहे.
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीशेठ बेलकर व मातोश्री मीराबाई आहेर शैक्षणिक संस्थेचे संचालक डॉ. दीपक आहेर,बाळासाहेब दाते यांनी या पॅनलचे नेतृत्त्व केले होते. दरम्यान या निवडणूकीत त्यांनी वर्चस्व सिध्द केले.
आणे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. या निवडणुकीत भैरवनाथ शेतकरी पॅनलने बाजी मारली असून विरोधी पॅनलला अवघ्या एका जागेवर
समाधान मानावे लागले. सेवा संस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधीमध्ये आहेर शंकर गंगाराम, दाते गणपत (सिताराम) पाटीलबुवा, दाते बाळासाहेब विठ्ठल, दाते विठ्ठल (रखमा) कारभारी, भोसले बाजीराव सावित्रा शिंदे बाळासाहेब गोविंद शिंदे सुरेश गंगाराम इतर मागास प्रवर्गामधून आहेर दिपक लक्ष्मण, महिला प्रतिनिधीमधून दाते चंद्रभागा शांताराम, बेलकर देऊबाई नारायण, अनुसुचित जाती / जमातीमधून आल्हाट संतोष शिवाजी, भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्गामधून गोफणे बबन रघुनाथ यांची निवड झाली आहे. विरोधी पॅनलचे रामदास पांडुरंग आहेर हे एकमेव विजयी झाले असून १२ विरुद्ध १ असा निकाल लागला आहे.