Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे कबुतर !

किंमत 14 कोटी!

जगात एक असे एक कबूतर आहे ज्याचे नाव न्यू किम बेल्जियम असे आहे. सध्या त्याचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे किम (न्यू किम बेल्जियम) ते जगातील सर्वात महागडे कबूतर बनले आहे. हे मादी कबूतर 14 कोटींना विकले जाते. या कबुतराला चीनमधील एका व्यक्तीने लिलावात सर्वाधिक बोली लावून जिंकले आहे. हा कबूतर निवृत्त रेसिंग फिमेल कबूतर आहे.
आता तुम्हाला वाटतं असेल, याची खासियत काय आहे? तर हे कबुतर दोन वर्षांचे आहे. ते सर्वोत्तम रेसर 2018 मध्ये अनेक स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले आहे. नॅशनल मिडल डिस्टन्स रेसमध्ये विजेत्या ठरलेल्या या मादी कबुतराचा वेग उत्कृष्ट आहे. बहुतेक लोक नर कबुतरांसाठी जास्त बोली लावतात, परंतु मादी कबुतरांना इतक्या किमतीत विकणे आश्चर्यकारक बाब आहे.
आजघडीला चीनमध्ये कबुतरांची शर्यत हा ट्रेंड बनत चाललाय. मादी रेसिंग कबूतरांचा वापर चांगल्या रेसर कबूतरांच्या निर्मितीसाठी होतो. पण इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी मादी कबुतरावर एवढी मोठी बोली लावली असेल.