Take a fresh look at your lifestyle.

चिंता सोडा! रेशन कार्डशी संबंधित ‘या’ सेवा ऑनलाईन मिळणार !

जाणून घ्या,कोणत्या सेवा उपलब्ध असतील ?

 

 

अनेकदा रेशन कार्ड अपडेट करताना, डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा? यासंदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत उपाय शोधला आहे. त्यानुसार आता तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन रेशन कार्ड संबंधित सेवांबद्दल अडचणी सोडवू शकता. डिजिटल इंडियाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.

▪️डिजिटल इंडियाने नक्की काय म्हटले? 

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यासह देशभरात 3.70 लाख CSC द्वारे रेशन कार्ड सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे देशभरातील 23.64 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होतं आहे.

▪️कोणत्या सेवा उपलब्ध असतील? 

1. रेशन कार्डाचे तपशील अपडेट करणे.

2. आधार सीडिंग करणे.

3. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंट मिळवणे.

4. रेशनच्या उपलब्धतेबद्दलची माहिती.

5. रेशन कार्डशी संबंधित तक्रारी करणे.

6. शिधापत्रिका हरवल्यास नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे.

▪️रेशन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतात? 

● भारतीय नागरिकत्व असलेला देशातील प्रत्येक नागरिक.

● 18 वर्षांखालील मुलांचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते.

● जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता.

रेशनकार्डचे तीन प्रकार आहेत : रेशनकार्ड तीन प्रकारची बनवली जातात.

दारिद्र्य रेषेच्यावर राहणाऱ्या लोकांसाठी : APL

दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी : BPL

सर्वात गरीब कुटुंबांसाठी : अंत्योदय

वरील श्रेणी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे ठरवली जाते. या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या गोष्टी, त्यांचे प्रमाण वेगळे राहते.