Take a fresh look at your lifestyle.

अरेरे ! महाविकास आघाडीची सत्ता जाणार !

"या" भाजपा नेत्याचे मोठे भाकित.

पुणे : देशभर सध्या निवडणुकीचे वारं वाहू लागले आहे. आगामी ५ राज्यांत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज (येत्या १४ ) फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊन सर्वच सर्वच पक्षांनी प्रचार करण्यावर भर दिला होता.
यानंतर या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती .निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले, यावेळी ते बोलत होते.