Take a fresh look at your lifestyle.

उदयनराजे पुन्हा करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

राजे म्हणतात,"सर्व पक्ष समभाव"

पुणे : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील सर्कीट हाऊस येथे भेट घेतली.या दोघांत जवळजवळ तासभर चर्चा रंगली.वास्तविक उदयनराजे सध्या भाजपमध्ये असून साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीने उदयनराजेंची मनधरणी करूनसुध्दा उदयनराजेंनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत उदयन राजे यांचा पराभव झाला होता.
सद्यस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये आहेत,परंतु अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीबद्दल त्यांना विचारले असता,त्यांनी सातार्याच्या विकास कामाबाबत दोघात सकारात्मक चर्चा झाली असून त्याबद्दलच दोघे बोललो अस सांगितले.
तसेच ते म्हणाले,येत्या काळातील नियोजनाबाबतही दोघांत चर्चा झाली.उदयनराजेंना ” तुम्ही राष्ट्रवादीत परत प्रवेश करणार का?” असे विचारले असता त्यांनी सांगितले शिवाजी महाराज म्हणत असत सर्व धर्म समभाव तसच मी म्हणतो, ” सर्व पक्ष समभाव” येत्या काळात उदयनराजे परत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे.