Take a fresh look at your lifestyle.

आहेसध्या ध्यानाला बसल्यावर काहीच कळत नाही,हे खरे आहे.

प्रथमावस्थेत हे असचं होणार.

आपल्या पैकी अनेकांनी आपण चर्चा करत असलेल्या ध्यान पद्धतीचा विचार केला हे मला खूप आनंद देणारे आहे.मुळात आपण ध्यान क्रियेसाठी यापूर्वी बसत नसाल तर सुरुवातीला शांतता मिळायची तर अस्वस्थ व्हायला होतं हा अनुभव येईल. लक्षात ठेवा बिछान्यावर पडल्यावर आपण काळजीने घेरले जात असाल आणि निद्रानाश होत असेल तर आपल्यासाठी ध्यानधारणे इतका सुंदर उपचार दुसरा असुच शकत नाही. बाहेरुन घेतलेली औषधं तुम्हाला झोपवतीलही पण ही कायमची व्यवस्था होऊ नये,अन्यथा ती कायमचीच झोपण्याची व्यवस्था होईल.
आपण पहिल्यांदा बसायला शिकायचं आहे.सुरुवातीला पंधरा मिनिटे खूप झाली. सुखासनात बसा,म्हणजे तुम्हाला आरामदायी वाटेल अशा स्थितीत बसा.पण पाठीचा कणा मात्र ताठ असला पाहिजे. अनेक विचार येतील,मन स्थिर होणार नाही. काय बरं करावं?असा विचार,त्यातअजुन भर घालील.आपली श्रद्धेय मुर्ती डोळ्यासमोर आणण्यात आपण अयशस्वी होत असल्याचं वाटेल.पण चिंता करु नका.
पंधरा मिनिटे डोळे बंद करून बसायचच हे निश्चित करा.ठरल्याप्रमाणे हे पहाटेच करायचं आहे. या दरम्यान मनमतीने इतर कोणत्याही क्रिया करु नयेत.श्वासांशी कोणताही खेळ करु नये.फार तर आपला नियमित श्वास कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक विचार ऐका आणि त्याला हकलण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा.एक आलेला विचार अर्ध्यावर साडु नका.त्याचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा त्याला विचारात स्थान द्यायचे नाही.
हळूहळू विचारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा आहे.या सर्व प्रयत्नात मनालाअत्यंत प्रामाणिक व्यवहार करायला भाग पाडायचं आहे हे विसरु नका.कारण त्याशिवाय चित्तशुद्धीकरण प्रक्रिया सुरु होणार नाही.यासाठी पंधरा दिवस द्यायचे आहेत. त्यानंतर पुढील क्रियेवर आपण चिंतन करु.
रामकृष्णहरी