Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸13 फेब्रुवारी 2022  

0

 

▪️मेष : इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा.
▪️वृषभ : मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील.
▪️मिथुन : कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
▪️कर्क : वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका.
▪️सिंह : इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
▪️कन्या : उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल. बौद्धिक थकवा जाणवेल.
▪️तूळ : नसते साहस करतांना सारासार विचार करावा. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल.
▪️वृश्चिक : मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी. वादावादीत सहभाग नोंदवू नका.
▪️धनू : आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका. आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा.
▪️मकर : सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील.
▪️कुंभ : मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल.
▪️मीन : तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.
Leave A Reply

Your email address will not be published.