Take a fresh look at your lifestyle.

कारणाशिवाय आनंदी रहायला शिकूया!

युवकांनो हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे.

“कारण” हा शब्द चांगल्यापेक्षा वाईटाचीच जास्त ओळख करून देणारा आहे.राजकारण,समाजकारण यामधला कारणभाव जास्त सतावणारा नाही. पण वैयक्तिक आयुष्यात कारण शब्द फारच नुकसान करणारा आहे.
मी अमक्या मित्राबरोबर बोलत नाही, कारण….?
त्या कार्यक्रमात मला येता येणार नाही कारण…..?
मी हा असा वागतो कारण…..? इत्यादी, इत्यादी.
खरं कारण आपण कधीच खरं सांगत नाही. त्यामागे सुध्दा एक कारणामागचं कारण असतं.पण ते आपण कधीच ओठाबाहेर येऊ देत नाही. तो खरंतर सुक्ष्म अहंकार आहे.जाळत असतो आतल्याआत. उपनिषदांचा अभ्यास करताना खूप आनंदमयी गोष्टी मला सापडल्या आहेत.त्या तुम्हाला सोप्या शब्दांत देता याव्यात,यासाठी हा खटाटोप आहे.
युवकांनो तुमचा चेहरा तुम्हाला सतत टवटवीत, तेजपुंज, झळाळलेला, आनंदमयी ठेवता येतोका? तर त्याचं उत्तर नाही आहे.काय कारण आहे? तर कारणांची मोठ्ठी यादी आपल्याकडे आहे.
चिरतरुण रहाण्यामागे कारणच नसतं हे लक्षात ठेवण्यासारखं सत्य आहे.चेहरा हे मानसाचं आयुष्य कसं आहे हे सांगतो.
फेसरिडींग हे एक अभ्यासण्यासारखं शास्त्र आहे.त्यावर यथावकाश बोलु कधीतरी.
फिनिक्सच्या आनंदसिंधुमधे मला युवकांसाठी काहीतरी मार्गदर्शक सेवा निर्माण करण्याचाही विचार आहे.असो..आता याकडे लक्ष द्या.
कुठलीही कॉस्मेटिक वापण्याची गरज भासणार नाही जर असं वागलात तर!युवाअवस्थेत आनंदी रहायचं असेल तर हे करावच लागेल,ते असं…
आपण जितके म्हणून मनाला दुःखी करणारे विचार मनात साठवू त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.आपलं शरीर कसं आहे,याचा आरसा म्हणजे आपला चेहरा.तो गुलाबासारखा फुललेला असेल तरच आपण निरोगी जीवन जगण्याची इच्छा करू शकता. त्यासाठी विसरण्याची कला हस्तगत करा.वाईट प्रसंग विसरून जा.तो माझ्याशी बोलला नाही, त्यानं मला बोलावलं नाही, त्यानं मला विचारलं नाही, तो माझ्यापेक्षा लहान आहे,मोठा आहे,त्याच्याशी माझे वाद झाले आहेत. ही कारणं आपलं आयुष्य कमी करतात. ती कारणं चेहऱ्यावर रहातात,आणि चेहरा कधी खोटं बोलत नाही. मग चेहरा कायम काळवंडलेला.सतत दुसऱ्याचा निप्पाताचा विचार चेहरा निस्तेज करून टाकतो.एखाद्या व्यक्तीच्या दर्शनाने जर आपला आनंद नाहीसा होत असेल तर समजा टिव्ही तुमच्याकडे असुनही त्यावर काय पहायचं हे तुमच्या हातात नाही. कारण रिमोट दुसऱ्याकडे आहे.आपल्या टिव्हीचा रिमोट आपल्याकडेच असला पाहिजे.
युवकांनो तुटलेले मित्र पुन्हा जोडा.हात जोडून त्याची एकदा क्षमा मागा,कडकडुन मिठी मारल्याशिवाय तो रहाणार नाही. क्षणार्धात तुमच्या शरीरातील रसायणं बदलतील. तेजपुंज होण्यासाठी तुमच्या आयुष्यात टाकलेलं ते पहिलं पाऊल असेल.
तुम्ही तहानलेल्या व्यक्तीसाठी पाण्याचा झरा आहात, भुकेलेल्या व्यक्तीसाठी अन्नदाते आहात, गरजवंतासाठी आधार आहात.हे कधीच विसरू नका.”कारण”हेच तुमचं खरं रुप आहे.कारणाशिवाय आनंदी रहायला शिकलात तर समाजालाही आनंद देऊ शकाल.

मग!पटतयना माझं म्हणणं?
युवकांनो मी जे आनंदी जीवन जगत आहे, त्या जीवनामधे मी क्षमेला सर्वोच्च स्थान दिले आहे.
क्षमा करणे आणि क्षमा मागणे यासाठी उशीर करणारा श्रेष्ठ पुरुषार्थ करु शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.असं माझे गुरूदेव बाबा हरदेवजी वारंवार सांगतात. आपणही हे आमलात आणावं.
आपला तुटलेला एखादा मित्र,नातेवाईक आपण जोडलात तर मला जरूर कळवा.
माझ्याही विषयी कुणाच्या मनात सल असेल,पुर्वी काही कारणाणं अबोला झाला असेल,समज,गैरसमज असतील तर थेट बोला माझ्याशी…कारणामागची कारणं न विचारता,मी क्षमा मागेल तात्काळ.
रामकृष्णहरी