Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸12 फेब्रुवारी 2022

▪️मेष : चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल.
▪️वृषभ : गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल. कमिशनमधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी.
▪️मिथुन : जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल.
▪️कर्क : विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
▪️सिंह : कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे.
▪️कन्या : वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.
▪️तूळ : मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल.
▪️वृश्चिक : गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील. भडक शब्दांचा वापर करू नये.
▪️धनू : मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको.
▪️मकर : सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.
▪️कुंभ : मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका.
▪️मीन : कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत.