Take a fresh look at your lifestyle.

‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकली राणू मंडल !

मुंबई : साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची चर्चा सतत सुरू आहे. चित्रपटातील गाण्यांसह त्यातील स्टाईलने अनेकांना भुरळ घातली आहे. दरम्यान, आता श्रीवल्ली गाण्यावर राणू मंडलचा डान्स व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये राणू मंडल पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर थिरकतांना दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात काठी असल्याचे दिसत आहे. राणू मंडलच्या या व्हिडीओला अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून काही नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, ‘पुष्पा : ज राइज’ हा चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जूनच्या हटके स्टाईलने आजवर अनेकांना भुरळ घातले असून बऱ्याच सेलिब्रिटींनी यावर व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. आज ही पुष्पा चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे.