तंत्रज्ञान तुमचे पॅन कार्ड हरवलयं का? ‘ही’ प्रक्रिया करा आणि काही मिनिटांत नवं मिळवा! By Parner News Last updated Feb 9, 2022 0 Share आर्थिक किंवा अन्य व्यवहारांसाठी अत्यंत आवश्यक असलेले पॅनकार्ड अनावधानाने तुमच्याकडून हरवले तर काय करायचे? असा मोठा प्रश्न उभा राहतो. मात्र काळजी करू नका. एक सोपी प्रक्रिया करून तुम्ही पॅनकार्ड सहज मिळवू शकता. आज त्याबद्दल जाणून घेऊयात… नवं कार्ड मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा : ▪️ सर्वप्रथम आयकर वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. ▪️ आता ‘इन्स्टंट ई पॅन’ या पर्यायावर क्लिक करा. ▪️ यानंतर ‘New E PAN’ पर्याय निवडा. ▪️ आता तुमचा पॅन क्रमांक टाका. ▪️ पॅनकार्ड लक्षात नसेल नसेल, तर आधार कार्ड क्रमांक टाका. ▪️ या प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा. ▪️ जर सदर प्रक्रिया मान्य असेल, तर पुढे ‘Accept’ या पर्यायावर क्लिक करा. ▪️ यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका. ▪️ पुढे दिलेले तपशील वाचून ‘Confirm’ करा. ▪️ आता तुमचे पॅनकार्ड तुम्हाला ई-मेलवर PDF फॉरमॅटमध्ये पाठवले जाईल. ▪️ यानंतर तुम्ही ‘ई-पॅन’ डाउनलोड करू शकता. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail