Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून लोकांमध्ये अजितदादा पवारांची भीती वाटतेय !

भाजपाच्या 'या' नेत्याने साधलाय जोरदार निशाणा.

पुणे : अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर जोरदार निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री, तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर एक गंभीर आरोप केलाय. अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचे, जमिनी लाटण्याचे काम केले. अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले
▪️चंद्रकांत पाटलांचा नेमका आरोप काय?
‘अडाणी म्हाताऱ्या माणसालाही हे माहिती आहे की 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी देतात. आता मग तो मत मोदींना देणार की पवारांना देणार? की ज्यांनी आयुष्यभर पैसे लोकांचे पैसे काढून घेण्याचेच काम केले. जमिनी काढून घेण्याचे काम केले. मला असे कळले की मांजरीवाल्यांना काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात आले होते. तेव्हा ते नको बोलले कारण पवार आमच्या जमिनी लाटून घेतात. म्हणून पुन्हा ते महापालिकेतून काढून घेण्यात आले.
एकदा गेले होतो महापालिकेत पण अजित पवारांची इतकी भीती की, म्हणाले आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि घेऊन जातील. ते हेलिकॉप्टरने वरुन बघतात की कुणाकुणाच्या जमिनी शिल्लक आहेत. धरणाच्या सोडत नाहीत, कशाच्याच सोडत नाहीत. त्यामुळे लोकांना हे कळते की मोदी 6 हजार रुपये देतात, कोरोना लस देतात, गरोदर स्त्रिला 6 हजार रुपये देतात, रेशन फ्री देतात, टॉयलेट फ्री देतात, गॅस फ्री देतात’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.