कर्मानुसार कर्मगती ठरलेली आहे. ती सुक्ष्म असल्याने आज केलेल्या कर्माचा उद्या जाब द्यावाच लागेल हे सत्य वाटत नाही. चित्रगुप्ताकडे सर्व कर्माचा हिशोब असतो असं आपण ऐकलं असेल.तो कुठे आहे म्हटलं की वर पहातात बरेच जन.चित्रगुप्त समजून घेऊया.
चित्र हा चित्ताचा विषय आहे.आणि तो प्रत्येकाला मिळालेला अदृश्य अवयव आहे. असं समजा चित्त म्हणजे आमची फोटो,व्हिडिओ गॅलरी आहे.ते दुसऱ्याला पहाता येत नाही. म्हणजे ते गुप्त आहे. असा तो चित्रगुप्त आहे. आपल्याकडुन घडलेल्या सर्व कर्माचे व्हिडीओ तेथे उपलब्ध आहेत.आपण ध्यानसाधनेत पहिल्यांदा याचाच विचार करायचा आहे.
आपल्या वागण्यानं दुसऱ्याला होणारं दुःख आपण बहुतांश विचारात घेत नाही. त्यातही ज्याला दुःख होत आहे त्याने ते व्यक्त केले नाही तर आपल्याला उत्तरादाखल येणारा भोग अतिउच्चतम दुःख देणारा असेल.असं प्रारब्ध थांबवणं शक्य आहे. जहाँसे जागे वही सवेरा। असच समजायचं.चुक लक्षात आली.संबंधीत व्यक्तीची क्षमा मागा.पुन्हा असं होणार नाही असं अश्वासित करा.समोरची व्यक्ती आश्चर्यचकित होऊन क्षमा करील यात संदेह नाही.ध्यान धारणेच्या तयारीसाठी आम्हाला यावरच पहिल्यांदा विचार करायचा आहे.ध्यानात चित्तजागृती व्हायलाच हवी.कारण चित्तशुद्धी शिवाय ध्यान प्रक्रिया सुरुच होत नाही.