Take a fresh look at your lifestyle.

सुंदर विचार आणि सकारात्मकता यावरच जीवनाची दिशा ठरते !

प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे मत. 

पारनेर : प्रत्येक व्यक्तीचे जगणे हे सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते विचार सुंदर असतील आणि सकारात्मक असतील तर त्याला नेहमी लोक आठवणीत ठेवत असतात, कारण जगणे सुंदर होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातले ध्येय निश्चित केले पाहिजे असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नियमित उपक्रमांतर्गत या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे बोलत होते.
प्रा. शिंदे पुढे म्हणाले की,आपणा स्वतःला व आपल्या आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जीवनात काही तरी मिळाले व आपण एका प्रकारची उंची गाठली आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा बडेजाव न करता किंवा असलेला पदाचा गर्व न करता आपण व्यवस्थित मार्गाने जीवन जगत राहिलो तर आपले जीवन सत्कर्मी लागत असते . पुढील दिवस पाहण्यासाठी तुम्ही कसे तयार आहात यावरच खऱ्या अर्थाने जगणे सुंदर होते असेही प्रा. शिंदे म्हणाले.
जीवनामध्ये काही दु:ख असतात अशावेळी खचून न जाता मात करायला शिकायचे असते कारण दुःख ही ठराविक काळासाठी असतात मात्र सुख आयुष्यभरासाठी असत कारण कधी कधी कोणाचे जगणे कोणाला काय शिकवून जाईल हे सांगता येत नसते आयुष्याचे गणित असंच काहीतरी असतं प्रारब्धा मध्ये काही संकटे आली तरी कधीच डगमगून जायचं नसतं स्वप्नात तुटली तरी आत्मविश्वासाने नवीन जग उभं करायचं असतं तरच जगणं सुंदर होत असते असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के.आहेर म्हणाले की, प्रत्येकाने आपले आयुष्य सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे नवनवीन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण केलेले कार्य अतिशय प्रामाणिकपणे केले पाहिजे प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे कारण आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत स्वतःमध्ये जर बदल केला तरच आपण आपल्या जीवनाची दिशा बदलू ठरू शकतो असेही प्राचार्य आहेर यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे , कार्यक्रम अधिकारी प्रा.संजय आहेर प्रा डॉ.अशोक घोरपडे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय आहेर यांनी केले तर आभार प्रा .प्रतीक्षा तनपुरे यांनी मानले.