Take a fresh look at your lifestyle.

जगातील सर्वात महागडा गुलाब !

किंमत ऐकून हैराण व्हाल!

जगभरात गुलाबाच्या हजारो प्रजाती असतील मात्र त्यामधील एक गुलाब एवढं खास आहे की, त्याची गणना जगातील सर्वात महागड्या गुलाबामध्ये केली जात आहे. या गुलाबाची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…

माहितीनुसार या गुलाबाचे नाव ज्युलिएट गुलाब असे असून त्याची किंमत तब्बल 112 कोटी रुपये एवढी आहे. हे गुलाब एवढं महाग असण्याचं कारण म्हणजे त्याची शेती करणं मेहनतीचं काम आहे. हे गुलाब सर्वात अगोदर 2006 मध्ये समोर आले होते.
या गुलाबावर प्रयोग आणि त्याची शेती करणाऱ्या डेव्हिड ऑस्टिन यांनी हे गुलाब विशेष पद्धतीने रुजवले. त्यांनी अनेक पद्धतीच्या गुलाबांचा संकर करून या पद्धतीच्या गुलाबाचं फूल तयार केलं आहे. ज्याला ज्युलिएट रोझ असं नाव दिलं गेलंय.

पोलन नेशनचा एक अहवाल सांगतो की, हे गुलाब फुलवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा वेळ लागला. डेव्हिडने 2006 मध्ये जे पहिले ज्युलिएट गुलाब तयार केले. तेव्हा त्याची किंमत 90 कोटी रुपये एवढी होती. या गुलाबाचा सुगंधही अत्यंत खास असा आहे. तो अगदी परफ्युमप्रमाणे भासतो. या गुलाबाचा सुगंध त्याला इतर गुलाबांपेक्षा वेगळा आणि खास बनवतो. हे गुलाब त्याचा सुगंध आणि रचनेमुळे नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.